जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध खतांचा संतुलित वापर करावा?

By
वर्षानुवर्षे जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन जातीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.  जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.


सेंद्रिय खते 
Organic Fertilizer

वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून  खते मिळतात. सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत

-
१. जोरखते - यामध्ये पोषण द्रव्यांचे प्रमाण भरखतापेक्षा अधिक असते. त्यामुळे ही खते कमी प्रमाणात द्यावी लागतात.
उदा. सर्व प्रकारच्यता पेंडी, झाडांचा चुरा , मासळी खत इत्यादी.

२. भरखते - यामध्ये पोषणद्रव्याचे प्रमाण कमी असल्याने भरखते रासायनिक खतांपेक्षा मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात. तसेच ही खते पिकांना सावकाशपणे लागू पडतात. भरखते वापरल्याने जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. त्यामुळे जमिनीची घडण सुधारते, जलधारण शक्ती वाढते व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. जमिनीचे आरोग्य सुधारते.

सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण- 

 अ.नं
 खताचे नाव
 अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्क्यांमध्ये %)
 नत्र
 स्फुरद
 पालाश
 1.
 कंपोस्ट
 0.81
 0.66
1.00
 2.
 लेंडी खत
0.61
0.51
0.71
 3.
 कोंबडी खत
 3.04
 2.64
 1.41
 4.
 शेणखत
 0.57
 0.36
 0.79
 5.
 सोनखत
 1.31
 1.11
 0.35
 6.
 भुईमूंग पेंड
 7.11
 1.41
 1.31
 7.
 सरकी पेंड
 6.41
 2.81
 2.51
 8.
 एरंडी पेंड
 4.51
 1.71
 0.71
 9.
 लिंबोळी पेंड
 5.03
 1.00
 1.51
 10.
 करंस पेंड
 3.91
 0.91
 1.21
 11.
 करडई पेंड
 4.90
 1.41
 1.19
 12.
 हाडचुरा
 3.51
 21.4
 0.01
 13.
 मासळी खत
 4.11
 0.91
 0.29

हिरवळीच्या खतांसाठी ताग, शेवरी, चवळी, गवार, किंवा धैंचा ही  पिके घ्यावीत व ती पेरणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी जमिनीत गाडावीत. गिरिपुष्प व सुबाभूळ यांचा कोवळा पाला सुद्धा हिरवळीच्या खतांसाठी वापरावा. हिरवळीच्या  हेक्टरी ७० ते १०० किलो नंतर  मिळते. जिरायत /कोरडवाहू क्षेत्रात ५ टन / हेक्टर आणि बागायत क्षेत्रात १० टन / हेक्टरी सेंद्रिय खाते द्यावीत.

सेंद्रिय खतांची गुणवत्ता ठरविणारी प्रमाणके -
  


 अ.नं

 सेंद्रिय खतातील घटक
 प्रमाण
 1.
 सेंद्रिय खताचा रंग
 भुरकट काळ तपकिरी
 2.
 वास
 मातकट
 3.
 कणांचा आकार
5  ते 10  मिमी .
 4.
 सामू (PH)
 6.6 ते 7.7
 5.
 कर्ब /नत्र गुणोत्तर प्रमाण
 20 पेक्षा कमी व 10 पेक्षा जास्त
 6.
जलधारण क्षमता
 30% पेक्षा जास्त
 7.
एकूण क्षारांचे प्रमाण
 2-5 डेसी सायमन प्र. मि .
 8.
 जिवाणूंचे प्रमाण


 अ ) जिवाणू (संख्या प्रती  ग्रॅ . )
 10X110 सी. एफ . यु .

 ब ) अक्टिनोमायसीड्स (संख्या प्रती  ग्रॅ . )
 10X109 सी. एफ . यु .

 क ) बुरशी (संख्या प्रति ग्रॅ . )
 10X107 सी. एफ . यु .

एक  टन शेणखतापासून मिळणारी अन्नद्रव्ये  -








एक  टन शेणखतापासून मिळणारी अन्नद्रव्ये


कोबाल्ट 1 ग्रॅ
नत्र 5.7 कि.
स्फुरद 3.6 कि.
पालाश 7.9 कि.
गंधक 1 कि.
मंगल 200 ग्रॅ.
जस्त 97 ग्रॅ.
लोह 81 ग्रॅ.
तांबे 15.7 ग्रॅ.
बोरॉन 20 ग्रॅ.

मॉलीब्डेनम 2.4 ग्रॅ.

 


0 comments:

Post a Comment