मिरचीची शेती कशी करावी (How to do chilly farming)

By
सुधारीत वाण -फुले ज्योती

लागवडीची वेळ -खरीप जून -जुलै 


बियाण्याचे प्रमाण -१.० ते १.२५ किलो प्रति हेक्टरी. रोप वाटिकेत रोपे तयार करावेत (४० ते ४५ दिवस)

लागवडीचे अंतर -खरीप ६० X ४५ से .मी .

खतांची मात्रा -१००:५०:५० नत्र :स्फुरद :पालाश किलो / हेक्टरी.

अंतर मशागत -१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी (निंदणी करणे ). लागवडीपासून एक महिन्याने वर खतांच्या मात्रा द्याव्यात. 

एकात्मिक अन्नद्रव्य -१) सेंद्रिय खते -२० ते २५ टन शेणखत / हेक्टर.
                               -२)जीवाणू खते -स्फुरद विरघडणारे जीवाणू २५ ग्रॅ./ किलो बियाण्यास चोळावे (मिश्रण        करावे ).

खते देण्याची वेळ -१)सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
                             -२)रासायनिक खते -१००:५०:५० किलो नत्र :स्फुरद :पालाश /हेक्टर,अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावीत व उर्वरीत ५० किलो नत्र २ सामान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
                            -३)जीवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
                             -४)बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची ५ ग्रॅ. प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

आंतरमशागत -१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी. म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.

कीड व रोग -फुल किडे: हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुराडा - मुराद असे म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल, ५ मिली किंवा फिप्रोनील ५ एस.सी. १५ मिली. या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करतांना पावसाळी वातावरणामध्ये चिकट द्रव्यांचा (०.१ %) वापर जरूर करावा.

कोळी -मिरची पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी ५ मिली. १० लीटर पाण्यातून फवारावे.

फळकूज आणि फांद्या वाढणे -या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची या फळांवर आणि पानांवर वर्तुळाकार,गोल डाग दिसतात. दमत हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात,फांद्या वाढणे या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मारतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वळतात. तसेच पानांवर फांद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुलून त्याचा नाश करावा तसेच मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी एक २५ ते ३० ग्रॅ. १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दार १५ दिवसाच्या अंतराने ३/४ फवारण्या कराव्यात.

भुरी रोग -भुरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बालवल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघडणारे गंधक ३० ग्रॅ. १० लिटर पाण्यात मिसळून २/३ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्या.

लिफ  कर्ल (चुराडा मुरडा ) -हा विषाणू जन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे,मावा आणि कोळी या रस शोषून घेणाऱ्या किडी मार्फत  होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानाची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते. नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १५ मिली/१० लिटर पाण्यात दार १५ दिवसांनी ४ ते ५ फवारण्या कराव्यात फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फेप्रोनील ५ एस. सी. १५ मिली आणि कोळीचा नियंत्रणासाठी फेनॅक्झाक्विन  १० ईसी . २५ मिली . प्रति १० लिटर  पाण्यातून फवारावे.

उत्पादन : हिरवी मिरची : १०० ते २०० क्विंटल / हेक्टरी
              लाल वाळलेली मिरची : १५ ते २० क्विंटल / हेक्टरी

2 comments:

  1. उन्हाळी मिरची लागवड 2020, प्रत्येकाला दररोज च्या आहारात मिरची किती महत्वाची आहे. तिखटपणा व स्वाद असल्याने प्रत्येक कुटुंबात स्वयंपाकासाठी मिरची लागते https://indiatimepress.blogspot.com/2020/03/Unhali-mirchi-lagavad.html

    ReplyDelete
  2. मीरची चे भी आहे तर रोप करें बनवायचे

    ReplyDelete