गव्हाचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे (How to do Wheat Farming)

By // No comments:
गव्हाचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे (How to do Wheat Farming)
जमीन :-

पाण्याचा चांगला निचरा होणारी ,भारी व खोल जमिनीची निवड करावी, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येते . 

Wheat Farming


मशागत :-

खरीप हंगामातील पीक निघाल्यावर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोलवर नागरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी .

सुधारित वाण :-

निफाड ३४ - हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण  आहे. NIAW-301 ( त्र्यंबक  ). NIAW - 917 (तपोवन ), NACS - 6122 हे सरबत्ती वाण  व NIAW - 295 ( गोदावरी ) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. NIAW - 15 ( पंचवटी ) AKDW-2997-१६ ( शरद ),NIAW-1415 ( नेत्रावती )

पेरणीची वेळ :-

जिरायती गव्हाची पेरणी ओक्टोम्बरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

बियाणे :-

दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे पेरावे उशिरा पेरणीसाठी दार हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशी नाशकाची ३ ग्रॅ. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅ ऍझोटोबॅक्टर व २५० ग्रॅ PSB या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ % वाढ होते .

पेरणी :-

पेरणीच्या वेडी जमिनित पुरेशी ओल  असावी . योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा  आल्यावर जमीन कुळवावी . बागायत गाव्हची वेळेवर पेरणी दोन ओडीत २० सें  मी  व उशिरा पेरणी १८ सें मी अंतर ठेऊन करावी . पेरणी उथड म्हणजे ५ ते ६ सें  मी . खोल करावी त्यामुळे उगवण चंगली होते . जिरायत गव्हाची पेरणी २ ओळीत ठेऊन करावी.


खत व्यवस्थापन  :-

बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी २० ते २५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे व व पेरणीसाठी दर  हेक्टरी १२० किलो नत्र (युरिया), ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
जिरायती गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र  आणि २० किलो स्फुरद पेरून द्यावे.
पाणी व्यवस्थापन - पेरणी नंतर शेत ओलून  घ्यावे त्यानंतर साधारण पने दर  १८ ते २१ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागते

आंतरमशागत :-

गव्हात चांदवेल,हरळी ( गवताचे प्रकार ) यासारख्या ताणाचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरी प्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. अंतरमशागतीमुळे ताणाचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गहू पिकातील अरुंद पानाचे आणि रुंद पानाच्या तण नितंत्रणासाठी पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी दर हेक्टरी  Isoprotyuron (५० %) दोन ते तीन किलो किंवा Metaslfuron Methail (२० %) हेक्टरी २० ग्रॅ. किंवा २, ४-डी ( सोडियम ) अधिक २ % युरिया ६०० ते १२५० ग्रॅ. ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारले नंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.

पीक संरक्षक :-

गहू या पिकात तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहचते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानिकारक रोग आहे. काळ्या तांबेऱ्यामुळे उत्पादनात २० ते ६० % घट  येते. नारंगी तांबेऱ्यामुळे काळ्या तांबेऱ्यापेक्षा नुकसान कमी होते. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरुरी पुरतेच द्यावे तांबेरा दिसू लागताच Mancozeb हे बुरशी नाशक १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारावे जरुरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी करावी. 

गव्हावर करपा  देखील प्रदूरभाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच copper oxicloride (०.२ %) अधिक Mancozeb (०.२ %) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. 

मावा या किडीच्या नियंत्रणासाठी Thayomithokzam २५ डब्लूजी ५० ग्रॅ. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उंदरांचा बंदोबस्त वेळीच करण्यासाठी एक भाग Zing Phosphaid ५० भाग कोणतेही भरड धान्य व थोडे गोडे तेल याचे विषारी अमिश तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बीड बुजवावीत. गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी, उन्हाळ्यात वाळविलेल्या बियाण्यास प्रति किलो ग्रॅ. या प्रमाणे व्यखंड भुकटी बीजप्रक्रिया करावी.

कापणी व मळणी :-

पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कंपनीस उशीर झाल्यास एनआय-५४३९ व त्रंबक ( NIAW-३०१ ) या गव्हाच्या वाणाचे दाणे झडू शकतात. म्हणून पीक भरण्याचे २ ते ३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ % असावेत.

उत्पादन :-

बागायती वेळेवर केल्यास हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल,
बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्विंटल.
जिरायती लागवड केल्यास १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते. 

मक्याचे दर्जेदार उत्पन्न कसे घ्यावे

By // No comments:
जमिनीचा प्रकार -  
मध्यम ते भारी, खोल , रेतीयुक्त , उत्तम निच - याची विशेषतः नदी काठची गाळाची जमीन फारच उत्तम .
पूर्व मशागत - एक खोल नांगरट, २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन २० ते २५ गाड्या प्रति हेक्टरी शेणखत / कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत / कंपोस्ट खताची जरुरी  नसते.

वाण 

उशिरा  येणारे वाण : (११० ते १२० दिवस )


१. संकरित वाण - पी . एच . एम . -१ ,पी . एच . एम . -३, सीड टेक -२३२४, बायो - ९६८१, एच एम - ११, क्यु . पी.  एम ७

२. संमिश्र वाण - प्रभात , शतक - १९०५

मध्यम  कालावधीत तयार होणारे वाण ( १०० ते ११० दिवस )

१ . संकरित वाण - डी . एच . एम - ११९, डी . एच . एम -११७,  एच एम - १०,  एच एम - ०८,  एच एम - ०४, पी . एच . एम .- ०४, एन .सी . एच ३७, बायो ९६३७, राजर्षी.

२. संमिश्र वाण - करवीर , मांजरी , नवज्योत ,

लवकर तयार होणारे वाण  (९० ते १०० दिवस )


१. संकरित वाण - जे. एच. ३४५९, पुसा हायब्रीड - १, जे. के २४९२
२. संमिश्र वाण  - पंचगंगा , प्रकाश , किरण .

अति लवकर येणारे वाण (८० ते ९० दिवस )

१. संकरित वाण - विवेक - ०९, विवेक - २१, विवेक - २७, विवेक क्यु  . पी. एम -७ .
२. संमिश्र वाण - विवेक - संकुल

मधुमक

१. संकरित वाण - एच . एस . सी .- १. 
२. संमिश्र वाण - माधुरी, प्रिया, वीण , ऑरेंज 

पॉपकॉर्न

संमिश्र वाण - अंबर पॉपकॉर्न , जवाहर पॉपकॉर्न - ११

बेबीकॉर्न -

१. संकरित वाण - एन एच ४
२. संमिश्र वाण - व्ही . एल बेबीकॉर्न - १ , व्ही . एल ७८. 

चाऱ्यासाठी संमिश्र वाण

प्रताप चारी - ६. 

पेरणीची वेळ - खरीप जून ते जुलै दुसरा आठवडा. 

रब्बी १५ ओक्टोम्बर ते १० नोव्हेंबर

उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी दुसरा आठवडा.

पेरणीची पद्धत - टोकन

टोकणीचे अंतर - ७५ सेमी * २० सेमी - उशिरा व मध्यम  कालावधीच्या वाणांसाठी
                       -  ६० सेमी * २० सेमी - कमी कालावधीच्या वाणांसाठी . 

बियाणे - १५ - २० किलो / हेक्टरी

बीज प्रक्रिया - २ ते २.५ ग्रॅ . थायरम / किलो बियाण्यास  लावावे.

आंतरपिके

खरीप - मका + उडीद / मुंग / चवळी / सोयाबीन / भुईमूंग / तुर.

रब्बी - मका + करडई / कोथिंबीर/ मेथी.

खत मात्रा

पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टर, पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र, पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टर : सूक्ष्म अन्नद्रव्य : जमिनीत झिंक ची कमतरता असल्यास हेक्टरी  २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

पाणी व्यवस्थापन - रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांनी व खरिपात जरुरी नुसार पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी पिकांच्या संवेदनशील अवस्था ....
१. वाढीची अवस्था (२० ते ४० दिवस )
२. फुलोरा अवस्था (४० ते ६० दिवस )
३. दाणे भरण्याची अवस्था (७० ते ८० दिवस )

पीक संरक्षण -

अ : किडी

१. खोडकिड - मका उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी कार्बारील ८५ % प्रवाही पाण्यात विरघळणारी पावडर हेक्टरी १७६४ ग्रॅ . किंवा डायमेथोएट ३० % प्रवाही हेक्टरी ६६० मिली यापैकी एकाची ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी अथवा फोरेट १० % दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १० किलो ग्रॅ प्रमाणे मातीत मिसळवावे.

२. खोडमाशी -
खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट ३० % प्रवाही हेक्टरी ११५५ मिली ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
३.  कणसे पोखरणारी अळी - या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पीक स्री -केसर येण्याचा अवस्थेत असतांना शेतात ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी कीटकांचे अंडीपुंज सोडावेत.

ब. रोग.

१. पूर्ण करपा - या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच डायथेन एम. ४५,०,२५ % प्रवाही या बुरशीनाशकाची फवारणी ५०० लिटर पाण्यातून करावी.

काढणी - 

मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्या नंतर कणसाची काढणी करावी आणि काढणी यंत्राचा वापर करून मळणी कारवी. नंतर धान्य उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडींमुळे नुकसान होणार नाही.

उत्पादन -  खरीप ८० ते १०० क्विंटल/हेक्टर.
              -  रब्बी ११० ते ११५ क्विंटल/हेक्टर. 

मिरचीची शेती कशी करावी (How to do chilly farming)

By // 2 comments:
सुधारीत वाण -फुले ज्योती

लागवडीची वेळ -खरीप जून -जुलै 


बियाण्याचे प्रमाण -१.० ते १.२५ किलो प्रति हेक्टरी. रोप वाटिकेत रोपे तयार करावेत (४० ते ४५ दिवस)

लागवडीचे अंतर -खरीप ६० X ४५ से .मी .

खतांची मात्रा -१००:५०:५० नत्र :स्फुरद :पालाश किलो / हेक्टरी.

अंतर मशागत -१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी (निंदणी करणे ). लागवडीपासून एक महिन्याने वर खतांच्या मात्रा द्याव्यात. 

एकात्मिक अन्नद्रव्य -१) सेंद्रिय खते -२० ते २५ टन शेणखत / हेक्टर.
                               -२)जीवाणू खते -स्फुरद विरघडणारे जीवाणू २५ ग्रॅ./ किलो बियाण्यास चोळावे (मिश्रण        करावे ).

खते देण्याची वेळ -१)सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
                             -२)रासायनिक खते -१००:५०:५० किलो नत्र :स्फुरद :पालाश /हेक्टर,अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावीत व उर्वरीत ५० किलो नत्र २ सामान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
                            -३)जीवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
                             -४)बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची ५ ग्रॅ. प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

आंतरमशागत -१५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी. म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.

कीड व रोग -फुल किडे: हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुराडा - मुराद असे म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल, ५ मिली किंवा फिप्रोनील ५ एस.सी. १५ मिली. या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करतांना पावसाळी वातावरणामध्ये चिकट द्रव्यांचा (०.१ %) वापर जरूर करावा.

कोळी -मिरची पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी ५ मिली. १० लीटर पाण्यातून फवारावे.

फळकूज आणि फांद्या वाढणे -या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची या फळांवर आणि पानांवर वर्तुळाकार,गोल डाग दिसतात. दमत हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात,फांद्या वाढणे या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मारतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वळतात. तसेच पानांवर फांद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुलून त्याचा नाश करावा तसेच मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी एक २५ ते ३० ग्रॅ. १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दार १५ दिवसाच्या अंतराने ३/४ फवारण्या कराव्यात.

भुरी रोग -भुरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खालच्या बाजूस पांढरी बुरशी दिसते. रोग जास्त बालवल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघडणारे गंधक ३० ग्रॅ. १० लिटर पाण्यात मिसळून २/३ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्या.

लिफ  कर्ल (चुराडा मुरडा ) -हा विषाणू जन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे,मावा आणि कोळी या रस शोषून घेणाऱ्या किडी मार्फत  होतो. या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानाची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते. नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १५ मिली/१० लिटर पाण्यात दार १५ दिवसांनी ४ ते ५ फवारण्या कराव्यात फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फेप्रोनील ५ एस. सी. १५ मिली आणि कोळीचा नियंत्रणासाठी फेनॅक्झाक्विन  १० ईसी . २५ मिली . प्रति १० लिटर  पाण्यातून फवारावे.

उत्पादन : हिरवी मिरची : १०० ते २०० क्विंटल / हेक्टरी
              लाल वाळलेली मिरची : १५ ते २० क्विंटल / हेक्टरी

केळी

By // No comments:
जमीन -
केळीसाठी माध्यम ते  भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमिनीचा सामू (६.५) ते ८  च्या दरम्यान असावा. क्षारयुक्त चोकन  व चुनखडी युक्त जमिनीत केळीची लागवड करू नये.

Banana-tree


जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध खतांचा संतुलित वापर करावा?

By // No comments:
वर्षानुवर्षे जमिनीत घेत असलेल्या पिकांमुळे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन जातीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.  जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी विविध एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.


सेंद्रिय खते 
Organic Fertilizer

वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषापासून  खते मिळतात. सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत

Step By Step Agricultural Guide for Modern Farming

By // No comments:
Hello Everyone, let me tell you something about AgriGossip. We have started AgriGossip to help all the farmers in the world to grow their agricultural business quickly. If you face any problem related to agriculture or farming. You can reach us by submitting your query in contact us form.
soil test