जमीन -
केळीसाठी माध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. जमिनीचा सामू (६.५) ते ८ च्या दरम्यान असावा. क्षारयुक्त चोकन व चुनखडी युक्त जमिनीत केळीची लागवड करू नये.
लागवड हंगाम -
मृग, बाग (जून ते जुलै लागवड), कांदेबाग (ऑक्टोबर ते नोव्हेंबर लागवड).
केळीचे वाण -
१. बसराई
२. श्रीमंती
३. ग्रॅड नैन
४. वसई
५. टिश्यु
६. हरसाल
केळी लागवडीचे अंतर - १.५ X १.५ मीटर (हेक्टरी ४४४४ झाडे )
केळीसाठी कंद निवडायची प्रक्रिया - केळी लागवडीसाठी कंद मुनवे निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद ३ ते ४ महिने वयाचे , ४५० ते ७५० ग्रॅ . वजनाचे आणि उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदावर ३ ते ४ रिंगा ठेऊन खालील बाजूने वरच्यावर कंद तपासून घ्यावा. लागवडीसाठी आता उतिसंवर्धित रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे. उतिसंवर्धित रोपे एकसारख्या वाढीचे, ३. ते ४५ से. मी. उंचीचे आणि किमान ६ ते ७ पाने असलेले असावेत.
खत व्यवस्थापन -
सेंद्रिय खते -
शेणखत - १० किलो /झाड किंवा गांडूळखत - ५ किलो / झाड.
जैविक खते -
अझोस्प्रिलम - २५ ग्रा /झाड व पी . एस . बी - २५ ग्रा /झाड केळी लागवडीच्या वेळी
रासायनिक खते - केळीसाठी प्रति झाडास २०० ग्रॅ . नत्र ४० ग्रॅ .स्फुरद व २०० ग्रॅ .पालाश देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देतांना त्यांच्या अधिक कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पद्धतीने किंवा कोली घेऊन खते द्यावीत .
तक्ता १- केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (ग्रॅम /झाड )
( तक्त्यात दिलेल्या खत मात्रेत माती परीक्षण अहवालानुसार योग्य ते बदल करावे )
फर्टिगेशन -
केळीच्या अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रेच्या ७५ % मात्रा ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
आंतर मशागत -
केळी बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कुळवणी ( वखरणी ) वेळीच करावी. लागवडीनंतर ३ -४ महिन्यापर्यंत अशी कुळवणी करता येते .
दर ३ महिने अंतराने टिचनी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी .
केळीची पिल्ले (पिलं) धारदार कोयत्याने नियमित काढावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत.
हिरवी पाने कापू नये.
झाडे पडू नये म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रोपिलिनच्या पट्ट्यांच्या साहाय्याने झाडांना आधार द्यावा.
केळी घडांची गुणवत्ता वाढवणे -
१ . घड पूर्ण निसवल्यावर केळ फुलं वेळीच कापावे.
२. घडावर ८-९ फण्या ठेऊन बाकी खालच्या फण्या धारदार विडीने सुरुवातीलाच कापून टाकाव्यात.
३ केळीचा घड पूर्ण निसवल्यावर व केळ फुलं तोडल्यावर त्यावर १० लिटर पाण्यात ५० ग्रॅ . पोटॅशियम डायहायड्रोजेन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅ . युरिया अधिक स्टिकर (१० मिली स्टिक ) मिसळून फवारणी केल्याने लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होते.
४. केळीचे घड ०.५ मिमी जाडीच्या ७५ X १०० सें. मी . आकाराच्या ६ % सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी झाकावेत.
आंतरपिके -
केळी बागेत हंगाम निहाय, चवळी , उडीद, मुंग, भुईमूंग यासारखी आंतरपिके घेता येतात. परंतु बागेत काकडी , भोपळा , कलिंगड ,खरबूज तसेच मिरची , वांगे , यासारखी पिके घेणे कटाक्षाने टाळावे.
केळी वरील रोगांच्या नियंत्रणाचे उपाय -

अ. न .
|
खत मात्रा
देण्याची वेळ
|
युरिया
|
सिंगल सुपर
फॉस्फेट
|
म्युरेट ऑफ
पोटॅश
|
लागवळीनंतर ३०
दिवसांच्या आत.
|
82
|
250
|
83
|
|
लागवळीनंतर 75दिवसांनी
|
82
|
-
|
-
|
|
लागवळीनंतर 120 दिवसांनी
|
82
|
-
|
-
|
|
लागवळीनंतर 165 दिवसांनी
|
82
|
-
|
83
|
|
लागवळीनंतर 210 दिवसांनी
|
36
|
-
|
-
|
|
लागवळीनंतर 255 दिवसांनी
|
36
|
-
|
83
|
|
लागवळीनंतर 300 दिवसांनी
|
36
|
-
|
83
|
|
एकूण
|
435
|
250
|
332
|
फर्टिगेशन -
केळीच्या अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्र व पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रेच्या ७५ % मात्रा ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
आंतर मशागत -
केळी बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी आडवी कुळवणी ( वखरणी ) वेळीच करावी. लागवडीनंतर ३ -४ महिन्यापर्यंत अशी कुळवणी करता येते .
दर ३ महिने अंतराने टिचनी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी .
केळीची पिल्ले (पिलं) धारदार कोयत्याने नियमित काढावीत. केळीची रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत.
हिरवी पाने कापू नये.
झाडे पडू नये म्हणून गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रोपिलिनच्या पट्ट्यांच्या साहाय्याने झाडांना आधार द्यावा.
केळी घडांची गुणवत्ता वाढवणे -
१ . घड पूर्ण निसवल्यावर केळ फुलं वेळीच कापावे.
२. घडावर ८-९ फण्या ठेऊन बाकी खालच्या फण्या धारदार विडीने सुरुवातीलाच कापून टाकाव्यात.
३ केळीचा घड पूर्ण निसवल्यावर व केळ फुलं तोडल्यावर त्यावर १० लिटर पाण्यात ५० ग्रॅ . पोटॅशियम डायहायड्रोजेन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅ . युरिया अधिक स्टिकर (१० मिली स्टिक ) मिसळून फवारणी केल्याने लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होते.
४. केळीचे घड ०.५ मिमी जाडीच्या ७५ X १०० सें. मी . आकाराच्या ६ % सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी झाकावेत.
आंतरपिके -
केळी बागेत हंगाम निहाय, चवळी , उडीद, मुंग, भुईमूंग यासारखी आंतरपिके घेता येतात. परंतु बागेत काकडी , भोपळा , कलिंगड ,खरबूज तसेच मिरची , वांगे , यासारखी पिके घेणे कटाक्षाने टाळावे.
केळी वरील रोगांच्या नियंत्रणाचे उपाय -
रोगाचे नाव
|
नियंत्रणाचे उपाय
|
करपा
(सिगाटोका)
|
रोगग्रस्त पानांचा भाग / पाने काढून जाळावीत.
झाडांवर २५ ग्रॅ . डायथेन एम ४५ किंवा २५ ग्रॅ . कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा + मिनरल ऑइल १०० मिली +
चांगल्या प्रतीचे स्टिकर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
|
काळी अळी (सिगार एन्ड रॉट )
|
प्रादुर्भाव
ग्रस्त केळी काढून नष्ट करावीत. घडावर
१० ग्रॅ कार्बेडाझिम किंवा २५ ग्रॅ.
डायथेन एम ४५ + चांगल्या प्रतीचे स्टिकर १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
|
इर्विनिया रॉट
(हेडरॉट)
|
लागवडी नंतर
१०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅ . कॉपर ऑक्सिक्लोराइड + ३०० मिली . क्लोरोपायरीफॉस
यांचे द्रावण तयार करून प्रत्येक झाडास
२०० मिली . द्रावण टाकावे .
|
पूर्णगुच्छ (
बंची टॉप ) व पोंगासड ( इंफेक्शियस क्लोरॅसिस )
|
रोगाचा
प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाड उपटून नष्ट करावेत. रोगाचा प्रसार मावा
किडीमुळे होत असल्यामुळे झाडावर आंतरप्रवाही कीटकनाशकाचे फवारणी करावी.
केळी पिकात किंवा बागेभोवती काकडी वर्गीय, वांगी वर्गीय पिके घेऊ नयेत.
|
किडीचे नाव
|
नियंत्रणाचे उपाय
|
सोंडेकिड
|
पिकाची फेरपालट करावी
|
खोडकीड
|
बाग स्वच्छ ठेवावी . खोडवा घेणे टाळावे.
|
फुलकिडी
|
निंबोळी अर्क ५०० मि. ली. १० ली . पाण्यात मिसळून फवारणी करावी .
|
मावा
|
नियंत्रणासाठी डायमेथोएट २० मि. ली. १० ली.
पाण्यात मिसळून फवारावे
|
सूत्रकृमी
|
केळी
लागवडीच्या वेळी कंद तासून वरील क्रमाने प्रक्रिया करावी. लागवडीच्या वेळी
निंबोळी पेंडीचा वापर करावा. केळी बागेत झेंडू हे अंतर पीक घ्यावे.
|
0 comments:
Post a Comment