मक्याचे दर्जेदार उत्पन्न कसे घ्यावे

By
जमिनीचा प्रकार -  
मध्यम ते भारी, खोल , रेतीयुक्त , उत्तम निच - याची विशेषतः नदी काठची गाळाची जमीन फारच उत्तम .
पूर्व मशागत - एक खोल नांगरट, २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन २० ते २५ गाड्या प्रति हेक्टरी शेणखत / कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत / कंपोस्ट खताची जरुरी  नसते.

वाण 

उशिरा  येणारे वाण : (११० ते १२० दिवस )


१. संकरित वाण - पी . एच . एम . -१ ,पी . एच . एम . -३, सीड टेक -२३२४, बायो - ९६८१, एच एम - ११, क्यु . पी.  एम ७

२. संमिश्र वाण - प्रभात , शतक - १९०५

मध्यम  कालावधीत तयार होणारे वाण ( १०० ते ११० दिवस )

१ . संकरित वाण - डी . एच . एम - ११९, डी . एच . एम -११७,  एच एम - १०,  एच एम - ०८,  एच एम - ०४, पी . एच . एम .- ०४, एन .सी . एच ३७, बायो ९६३७, राजर्षी.

२. संमिश्र वाण - करवीर , मांजरी , नवज्योत ,

लवकर तयार होणारे वाण  (९० ते १०० दिवस )


१. संकरित वाण - जे. एच. ३४५९, पुसा हायब्रीड - १, जे. के २४९२
२. संमिश्र वाण  - पंचगंगा , प्रकाश , किरण .

अति लवकर येणारे वाण (८० ते ९० दिवस )

१. संकरित वाण - विवेक - ०९, विवेक - २१, विवेक - २७, विवेक क्यु  . पी. एम -७ .
२. संमिश्र वाण - विवेक - संकुल

मधुमक

१. संकरित वाण - एच . एस . सी .- १. 
२. संमिश्र वाण - माधुरी, प्रिया, वीण , ऑरेंज 

पॉपकॉर्न

संमिश्र वाण - अंबर पॉपकॉर्न , जवाहर पॉपकॉर्न - ११

बेबीकॉर्न -

१. संकरित वाण - एन एच ४
२. संमिश्र वाण - व्ही . एल बेबीकॉर्न - १ , व्ही . एल ७८. 

चाऱ्यासाठी संमिश्र वाण

प्रताप चारी - ६. 

पेरणीची वेळ - खरीप जून ते जुलै दुसरा आठवडा. 

रब्बी १५ ओक्टोम्बर ते १० नोव्हेंबर

उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी दुसरा आठवडा.

पेरणीची पद्धत - टोकन

टोकणीचे अंतर - ७५ सेमी * २० सेमी - उशिरा व मध्यम  कालावधीच्या वाणांसाठी
                       -  ६० सेमी * २० सेमी - कमी कालावधीच्या वाणांसाठी . 

बियाणे - १५ - २० किलो / हेक्टरी

बीज प्रक्रिया - २ ते २.५ ग्रॅ . थायरम / किलो बियाण्यास  लावावे.

आंतरपिके

खरीप - मका + उडीद / मुंग / चवळी / सोयाबीन / भुईमूंग / तुर.

रब्बी - मका + करडई / कोथिंबीर/ मेथी.

खत मात्रा

पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टर, पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र, पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी ४० किलो नत्र प्रति हेक्टर : सूक्ष्म अन्नद्रव्य : जमिनीत झिंक ची कमतरता असल्यास हेक्टरी  २० ते २५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

पाणी व्यवस्थापन - रब्बी हंगामात १० ते १२ दिवसांनी व खरिपात जरुरी नुसार पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी पिकांच्या संवेदनशील अवस्था ....
१. वाढीची अवस्था (२० ते ४० दिवस )
२. फुलोरा अवस्था (४० ते ६० दिवस )
३. दाणे भरण्याची अवस्था (७० ते ८० दिवस )

पीक संरक्षण -

अ : किडी

१. खोडकिड - मका उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी कार्बारील ८५ % प्रवाही पाण्यात विरघळणारी पावडर हेक्टरी १७६४ ग्रॅ . किंवा डायमेथोएट ३० % प्रवाही हेक्टरी ६६० मिली यापैकी एकाची ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी अथवा फोरेट १० % दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १० किलो ग्रॅ प्रमाणे मातीत मिसळवावे.

२. खोडमाशी -
खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट ३० % प्रवाही हेक्टरी ११५५ मिली ५०० ते १००० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
३.  कणसे पोखरणारी अळी - या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पीक स्री -केसर येण्याचा अवस्थेत असतांना शेतात ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी कीटकांचे अंडीपुंज सोडावेत.

ब. रोग.

१. पूर्ण करपा - या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच डायथेन एम. ४५,०,२५ % प्रवाही या बुरशीनाशकाची फवारणी ५०० लिटर पाण्यातून करावी.

काढणी - 

मक्याच्या कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्या नंतर कणसाची काढणी करावी आणि काढणी यंत्राचा वापर करून मळणी कारवी. नंतर धान्य उन्हात चांगले वाळवावे म्हणजे साठवणुकीत किडींमुळे नुकसान होणार नाही.

उत्पादन -  खरीप ८० ते १०० क्विंटल/हेक्टर.
              -  रब्बी ११० ते ११५ क्विंटल/हेक्टर. 

0 comments:

Post a Comment